-->

आपला खरा आवाज ...

पाऊस नाव घेऊन ' तो ' नुसताच बरसतोय

पाऊस नाव घेऊन ' तो ' नुसताच बरसतोय


तो नुसताच तडतडत असतो छपरांवर

तर कधी अगदी मुसमुसत असतो

 पागोळयांतून संथ निथळधार

कसले कसले संदर्भ घेउन ,

बरसत असतो  सैरभैर माळरानावर ...

धावत असतो झपाटल्यासारखा, डांबरी रस्यांवर

उनाड  वा-यासोबत धुवाँधार

काही देऊन  काही घेऊन

सरकत असतो मना-मनांतून

रिमझिमत तिच्या दारावर …

'पाऊस’ नाव घेउन'  ‘तो’

कधीपासून , ओल्या आठवणी घेऊन

‘तो’ नुसताच बरसतोय

‘तो’ नुसताच बरसतोय ....



अजय शेलार- 9819881172

Post a Comment

2 Comments