कोरा चहा
-- -- -- -- ----
तुला आवडतो पाउस रिम झिम सरीनी पडणारा
थेम्बा थेम्बानी रोमांचित करणारा ...
अवखल सरीनी पडणारा ...
पण माझ्या ... पाउस ...?
कधी घराच्या छतातुन टप टपणारा
घरातून दारात दारातून घरात ...
टोप- वाडगी अन् परतीत बसणार ...
मग सांग असा पाउस तुला आवडेल ?
अन् आवडणार असेल तर यंदाच्या पावसाळ्य़ाअत
तुलाच पहिल आमंत्रण येशील ?
येशील माझ्याकडचा पाउस पाह्यला ?
आलीस तर आईची कटकट अन्
पावसाची टपटप यांचा दुहेरी संगम
नक्कीच पाह्यला मिळेल ...
आई अन् बिचारा पाउस
यांच्यात जूम्पलेली असेल
मग सांग येशील ?
येशील माझ्याकडचा पाउस पाह्यला ?
अन् कान तुटलेल्या कपातिल
कोरा चहा प्यायला ?
(अजय शेलार - ९८१९८८११७२ )

0 Comments